अर्थभानअहमदनगरआंतरराष्ट्रीयआरोग्यएज्युदिशाऔरंगाबादकोकणकोल्हापूरक्राईम डायरीजालनाठाणेनाशिक / उत्तर महाराष्ट्रपालघरपुणेफीचर्सबहारभूमिपुत्रमनोरंजनमराठवाडामहाराष्ट्रमुंबईयुथवर्ल्डरायगडराष्ट्रीयविदर्भविश्वसंचारसंपादकीयसांगलीसातारासोलापूरस्पोर्ट्स

जय भीम : एका फॅक्टरीमध्ये काम करायचा ‘जय भीम’मधील सूर्या (Suriya)

पुढारी ऑनलाईन

तमिळ अभिनेता सूर्या शिवकुमार (Suriya) सध्या चर्चेत आहे. जय भीम हा मूळच्या तमिळ चित्रपटात त्याने चंद्रू वकिलाची भूमिका साकारलीय. सूर्याने वयाची पंचेचाळीशी पार केलेली आहे. (Surya) पण, त्याच्याकडे पाहिल्यानंतर आजही तो यंग स्टार दिसतो. आणि त्याप्रकराच्या भूमिकाही त्याला मिळत गेल्या. सूर्या तमिळ चित्रपटांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सूर्या साऊथच्या हाईएस्ट  पेड स्टार्सपैकी एक आहे. (Suriya)

सूर्या शिवकुमार (Suriya Sivakumar) ची चाहत्यांमधील ओळख ‘सिंघम (Singham)’ आहे. सिंघम आणि गजिनी यासारखे चित्रपटही त्याच्या नावावर आहेत. सूर्या तमिळ अभिनेते शिवकुमार यांचा मुलगा आहे. सूर्याचा भाऊ कार्थीदेखील दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करतो.

सूर्याने एका कपडे निर्यातीच्या फॅक्टरीमध्ये आठ महिने काम केले. येथे काम करत असताना त्याने आपली ओळख लपवली होती की, तो अभिनेता शिवकुमार यांचा मुलगा आहे. येथे एक हजार रुपये पगार त्याला मिळायचाय पण, जेव्हा फॅक्टरीच्या मालकाला सत्य समजलं, तेव्हा सूर्याने काम सोडलं. पुढे तो अभिनय विश्वात आला.

सूर्याने २२ व्या वर्षी दिग्दर्शक वसंत यांच्य ‘नेररुक्कू नेर’ (१९९७) मधून डेब्यू केला. या चित्रपटाचे निर्माते मणि रत्नम होते. सूर्याला खरी ओळख मिळाली ती ‘नंदा’ या चित्रपटातून. हा चित्रपट त्याच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. या चित्रपटासाठी तामिळनाडू स्टेट चित्रपट ॲवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सूर्याचे Singham आणि Ghajini शिवाय Pithamagan, Kaakha Kaakha, Nandha, Ayan, 7aum Arivu, Anjaan हे खास चित्रपट तुम्ही नक्की पाहा.

अभिनेत्री ज्योतिकासोबत लग्नगाठ

सूर्याने साऊथ अभिनेत्री ज्योतिकासोबत ११ सप्टेंबर, २००६ मध्ये लग्न केले होते. दोघांचे लग्न मोठ्या जल्लोषात झाले होते. सूर्या आणि ज्योतिकाने १९९९ मध्ये ‘पूवेल्लम केत्तुप्पर’ या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. त्यानंतर दोघांमध्ये अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. सूर्या-ज्योतिकाला एक मुलगी दीया आणि मुलगा देव आहे.

video – suriya_anna_official वरून साभार

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button