अर्थभानअहमदनगरआंतरराष्ट्रीयआरोग्यएज्युदिशाऔरंगाबादकोकणकोल्हापूरक्राईम डायरीजालनाठाणेनाशिक / उत्तर महाराष्ट्रपालघरपुणेफीचर्सबहारभूमिपुत्रमनोरंजनमराठवाडामहाराष्ट्रमुंबईयुथवर्ल्डरायगडराष्ट्रीयविदर्भविश्वसंचारसंपादकीयसांगलीसातारासोलापूरस्पोर्ट्स

बिग बॉस मराठी : मीरा-स्नेहा यांच्यामध्ये जोरदार भांडण

मुंबई; पुढारी ऑनलाईन :

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टन mira jagannath ला बिग बॉस यांच्या आदेशानुसार अतिशय कठीण असा निर्णय असा घ्यावा लागला. घरातील काही सदस्यांमुळे टास्क रद्द होतात. काही सदस्य घरातील नियमभंग करतात, काही सदस्यांद्वारे टास्कमध्ये आक्रमकता दाखविली जाते. अशा सदस्यांची नावे काल mira ला द्यावी लागली. ज्यामध्ये सोनाली, विकास, जय, विशाल आणि दादूस यांचे नावं होते. आजदेखील mira ला अशीच नवे द्यायची आहेत. आणि त्यावरून घरातील काही सदस्यांमध्ये वाद होणार आहे. मीरा-स्नेहा यांच्यामध्ये जोरदार भांडण होणार आहे. यानंतर मीरा-स्नेहा यांची मैत्री टिकेल की नाही, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

mira म्हणाली, स्वत: ट्राय नाही कारायचा. जय म्हणाला, स्वत:ला ट्राय काय नाही करायचे. आम्हीच ट्राय केले. जरा बघा डोळे उघडा आणि कान पण उघडा. त्यावर mira चे म्हणणे आहे तुम्ही प्रयत्न नाही केला.

विकासने देखील यावर त्याचे म्हणणे मांडले. ट्राय करण्याच्या बाबतीत तुम्ही जी तीन नावे दिली आहेत. त्यांनी सर्वात जास्त ट्राय केलं आहे असं मला अजूनही वाटतं आहे. जे लोकं सर्वात जास्त बोले आहेत तेच तळ्यात आहेत.

बाहेरून दिसताना हेच दिसणार आहे जे लोकं सर्वात जास्त बोले त्यांनाच तुम्ही शिक्षा देत आहात. या वादात स्नेहा आणि mira मध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी अडणार आहे.

mira चे म्हणणे आहे इथे समोर येते मी तेव्हा बोलायचे. स्नेहा बोलत असताना mira बोलत होती त्यावर स्नेहा म्हणाली ए थांब… mira तिला म्हणाली… थांब नाही बोलायच मला… स्नेहा म्हणाली, मी तेव्हाच बोले… mira म्हणाली, तेच तेच परत बोलून काहीच होणार नाहीये, जरा काहीतरी नवीन शोध. नक्की हा वाद कशावरून झाला ? बघूया आजच्या भागामध्ये.

बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button