अर्थभानअहमदनगरआंतरराष्ट्रीयआरोग्यएज्युदिशाऔरंगाबादकोकणकोल्हापूरक्राईम डायरीजालनाठाणेनाशिक / उत्तर महाराष्ट्रपालघरपुणेफीचर्सबहारभूमिपुत्रमनोरंजनमराठवाडामहाराष्ट्रमुंबईयुथवर्ल्डरायगडराष्ट्रीयविदर्भविश्वसंचारसंपादकीयसांगलीसातारासोलापूरस्पोर्ट्स

सावखेडा बु” येथील जवान पठाणकोट येथे चकमकीत शहीद

जळगाव, पुढारी वृत्तसेवा

पाचोरा तालुक्यातील सावखेडा बु” येथील ३५ वर्षाचा जवान नक्षलवाद्यांशी लढतांना शनिवारी मध्यरात्री पठाणकोट (पंजाब) येथे शहीद झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे सावखेडा बु”, सावखेडा खु”, वरखेडी, डांभुर्णी, मोंढाळे ता. भुसावळसह परिसरात मोठी शोककळा पसरली असून सावखेडा गावी घटनेची माहिती मिळताच मोठा जनसमुदाय लोटला होता.

वृद्ध आई वडील, दोन भावंडासह नातेवाईक व गावकऱ्यांनी एकच आक्रोश केला. शहीद जवानाचे पार्थीव सोमवारी पठाणकोट येथून विमानाने औरंगाबाद येथे आल्यानंतर तेथून मिलट्रीच्या वाहनातून गावी आणल्यानंतर सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे. पाचोरा शहरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सावखेडा बु” येथील जवान मंगलसिंग जयसिंग परदेशी (वय -३५) हा सन २००५ मधे अलीबाग येथे भारतीय सैन्यात भर्ती झाल्यानंतर त्याने सिकंदराबाद येथे प्रशिक्षण घेतले होते. सन २०१४ मध्ये त्याचा मोंढाळे ता. भुसावळ येथील मुलीशी विवाह झाल्यानंतर त्यास दोन मुली आणि एक मुलगा असे तीन अपत्य आहेत. पत्नी व कुटुंब मंगलसिंग जयसिंग सोबतच राहत होते.

दसऱ्याला घरी आल्यानंतर १५ दिवसांपूर्वी पठाणकोट येथे सेवेत झाला होता हजर

मंगलसिंग जयसिंग परदेशी हा दसऱ्यानिमित्त एक महिन्यासाठी घरी आपल्या कुटुंबासह सुट्टीवर आला होता. दि. ३० ऑक्टोबरला सुट्टी संपल्यानंतर पठाणकोट येथे सेवेत हजर झाला होता. या वर्षातील डिसेंबर अखेर सुट्टी संपल्याने गावी चार ते पाच रविवारी भैरवनाथाची यात्रा भरत असल्याने पुढील वर्षी जानेवारी महिन्यात यात्रेसाठी एक महिन्याच्या सुट्टी घेऊन कुटुंबियासह सुट्टी येणार असल्याचे जातांना सांगून गेला होता.

अतिशय मनमिळावू स्वाभावाचे व्यक्तीमत्व हरविले

मंगलसिंग जयसिंग परदेशी याचा स्वभाव सतत हसरा व मनमिळावू होता. नवनविन मित्र जमविणे, त्यांचेशी मैत्री करणे ही त्याचा स्वभाव गुण होता. सावखेडा बु” व सावखेडा खु” या दोन्ही गावात सुमारे ३० ते ३५ युवक भारतीय सैन्यात सेवेत असल्याने सुट्टीवर आल्यानंतर गावी आलेल्या मिंत्रांना भेटून त्यांची चौकशी करणे व त्यांच्यात वेळ घालविणे, त्याला आवडत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button