अर्थभानअहमदनगरआंतरराष्ट्रीयआरोग्यएज्युदिशाऔरंगाबादकोकणकोल्हापूरक्राईम डायरीजालनाठाणेनाशिक / उत्तर महाराष्ट्रपालघरपुणेफीचर्सबहारभूमिपुत्रमनोरंजनमराठवाडामहाराष्ट्रमुंबईयुथवर्ल्डरायगडराष्ट्रीयविदर्भविश्वसंचारसंपादकीयसांगलीसातारासोलापूरस्पोर्ट्स

Children’s Day special : मुलांना नक्की दाखवा ‘हे’ ५ सुंदर चित्रपट

पुढारी ऑनलाईन :

भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी म्हणजेच १४ नोव्हेंबर रोजी आपल्याकडे हा दिवस बालदिन (Children’s Day) म्हणून साजरा केला जातो. लहान मुलं म्‍हणजे देवाघरची फुलं. त्‍यांचा निरागसपणा भावूक करणारा. पंडित नेहरूंना मुलं आवडायची. लहान मुलांवर अनेक चित्रपट आले. त्यापैकी, काही खास बॉलिवूड चित्रपट वाखाणण्‍याजोगे आहेत. बॉलिवूडमधील हे पुढील चित्रपट पालकांनी आपल्या मुलांसोबत नक्कीच पाहायला हवेत. (Children’s Day)

मिस्टर इंडिया

मिस्टर इंडिया

अभिनेता अनिल कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्‍या या चित्रपटाने प्रेक्षकांना खिवून ठेवले. मुलांविषयी प्रेम आणि मुलांनी आपल्‍या भावाला (सांभाळ करणारा अनिल कपूर) साठी जीवही देण्यास तयार असणाऱ्या मुलांची कथा चित्रपटात मांडण्यात आली आहे.

‘मिस्टर इंडिया’ १९८७ मध्‍ये रिलीज झालेला हिट चित्रपट होता. चित्रपटातील बाल कलाकारांचा उत्तम अभिनय होता.

खास म्‍हणजे, सर्वांत छोटी ‘टीना’चा अभिनय. तिचे हाव-भाव आणि निरागसता प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. टीनाचं खरं नाव ‘हुजान खोदैजी’ असं आहे.

आय एम कलाम

एका छोट्‍या मुलाची प्रेरणादायी कथा या चित्रपटात दाखवण्‍यात आली आहे. परिस्थितीमुळे त्‍या लहान मुलाची स्‍वप्ने, कशी नाहीशी होतात. परंतु, स्वप्नांना बळ देऊन ते पूर्णत्‍वाकडे नेण्‍यासाठी जिद्‍दीने काम करण्‍याची त्‍या लहानग्‍याची साहसी कहाणी चित्रपटात पाहायला मिळते. हर्ष मायर या बाल कलाकाराने एका राजस्‍थानी मुलाची भूमिका केली होती.

देशाचे ‘मिसाईलमॅन’ ए. पी. जे. अब्‍दुल कलाम यांना भेटण्‍याची इच्‍छा या मुलाची असते. या मुलाने चित्रपटातील उत्तम अभिनयासाठीचे अनेक पुरस्‍कार आपल्‍या नावे केले आहेत.

तारे जमीन पर

आमिर खान, दर्शील सफारी, तान्या छेडा, सचेत इंजीनियर, टिस्का चोप्रा, विपिन शर्मा स्‍टारर ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट आपल्‍या मुलांसोबत पालकांनी नक्‍की पाहायला हवा. आमिर खानच्‍या दिग्‍दर्शनाखाली बनलेला हा पहिला चित्रपट होता. एका मुलाला केंद्रस्‍थानी ठेवून हा चित्रपट बनवण्‍यात आला होता.

आजच्या धावपळीच्‍या जगात पालकांना आपल्या मुलांकडे पुरेसं लक्ष देता येत नाही. त्‍यामुळे मुलांच्‍या आकांक्षा कशा कोमेजून जातात, मुलांवर त्‍याचा कसा परिणाम होतो, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

चिल्लर पार्टी

या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवालाने केली होती. तर सलमान खान सहनिर्माता होता. या चित्रपटात एका सोसायटीमधील लहान मुले एका कुत्र्याची काळजी कशाप्रकारे घेतात, हे दाखवण्यात आले आहे. एक मुलगा सोसायटीतील गाड्‍यांची साफसफाई करण्‍याचे काम करतो. हे काम करत असताना त्‍याचे सोसायटीतील इतर मुले मित्र होतात.

त्‍या मुलासोबत त्‍याचा एक पाळीव कुत्रा असतो. तो सोसायडीतल्‍या मुलांचा देखील प्रिय कुत्रा बनतो. ‘प्राणीप्रेम’ हा संदेश देणारा चित्रपट केवळ मुलांसाठी नाहीतर समाजासाठीही आहे.

स्टॅनली का डब्बा

अमोल गुप्‍ते दिग्‍दर्शित या चित्रपटाची कथा अत्‍यंत भावूक अशी आहे. ही कहाणी आहे स्टॅनली नावाच्‍या मुलाची. स्टॅनली शाळेतला हुशार विद्‍यार्थी असतो. त्‍याला शाळेतले शिक्षक प्रेम करत असतात. विशैश म्‍हणजे, स्‍टॅनलीच्‍या जेवणाचा डब्‍बा या मुद्द्‍यावर हा चित्रपट आधारलेला आहे.

शाळेतल्‍या शिक्षकांपैकी वर्मा नावाचे एक शिक्षक असतात. वर्मांना दुसर्‍यांचे डब्‍बे खाण्‍याची सवय असते. परंतु, स्टॅनली शाळेत जेवणाचा डबा आणत नाही. त्‍यामुळे वर्मा त्‍याला रोज ऐकवत असतात. नंतर स्टॅनली शाळेत डबा न आणण्‍याचं कारण समजतं. सत्‍य समजल्‍यानंतर प्रेक्षक देखील हबकून जातात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button