अर्थभानअहमदनगरआंतरराष्ट्रीयआरोग्यएज्युदिशाऔरंगाबादकोकणकोल्हापूरक्राईम डायरीजालनाठाणेनाशिक / उत्तर महाराष्ट्रपालघरपुणेफीचर्सबहारभूमिपुत्रमनोरंजनमराठवाडामहाराष्ट्रमुंबईयुथवर्ल्डरायगडराष्ट्रीयविदर्भविश्वसंचारसंपादकीयसांगलीसातारासोलापूरस्पोर्ट्स

Election: महानगरपालिका पोटनिवडणुकांसाठी ‘या’ तारखेला प्रारूप मतदार याद्या होणार प्रसिद्ध

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : Election : धुळे, अहमदनगर, नांदेड- वाघाळा, मीरा भाईंदर, सांगली मिरज कुपवाड आणि पनवेल या सहा महानगरपालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी १२ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर १६ नोव्हेंबर २०२१ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील.

राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व १ नोव्हेंबर २०२१ रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या या पोटनिवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी प्रारूप स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर १६ नोव्हेंबर पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर १७ नोव्हेंबर रोजी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. २२ नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध केल्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील.

प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशीही माहिती मदान यांनी दिली.

महानगरपालिकानिहाय रिक्त पदे

धुळे- ५ ब, अहमदनगर- ९ क, नांदेड वाघाळा- १३अ, मीरा भाईंदर- १० ड आणि २२ अ, सांगली मिरज कुपवाड- १६ अ आणि पनवेल- १५ ड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button