अर्थभानअहमदनगरआंतरराष्ट्रीयआरोग्यएज्युदिशाऔरंगाबादकोकणकोल्हापूरक्राईम डायरीजालनाठाणेनाशिक / उत्तर महाराष्ट्रपालघरपुणेफीचर्सबहारभूमिपुत्रमनोरंजनमराठवाडामहाराष्ट्रमुंबईयुथवर्ल्डरायगडराष्ट्रीयविदर्भविश्वसंचारसंपादकीयसांगलीसातारासोलापूरस्पोर्ट्स

ENG vs NZ : न्यूझीलंडने २०१९ चा बदला घेतला, इंग्लंडला नमवून फायनल प्रवेश

अबु धाबी : पुढारी ऑनलाईन

ENG vs NZ : इंग्लंडने २०१९ ला न्यूझीलंडचा सुपर ओव्हरमध्ये पराभव करत वर्ल्डकप जिंकला होता. आता न्यूझीलंडने यंदाच्या टी २० वर्ल्डकपमध्ये सेमी फायनलमध्ये इंग्लंडचा ५ विकेट्सनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. न्यूझीलंडने इंग्लंडचे १६७ धावांचे आव्हान १९ षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. न्यूझीलंडकडून निशेमने ११ चेंडूत २७ धावांची आक्रमक खेळी करत सामना आवाक्यात आणला. तर मिचेलने सावध फलंदाजी करत नाबाद ७२ धावांची खेळी केली. त्याला कॉनवॉयने ४२ धावांची खेळी करत चांगली साथ दिली.

इंग्लंडने ठेवलेल्या १६७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची ( ENG vs NZ ) सुरुवात खराब झाली. क्रिस वोक्सने मार्टिन गुप्टीलला ४ तर केन विल्यमसनला ५ धावांवर बाद करत दोन धक्के दिले. त्यानंतर डॅरेल मिचेल आणि डेवॉन कॉनवॉय यांनी सावध फलंदाजी करत न्यूझीलंडचा डाव सावरण्यास सुरुवात केली.

या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी रचली खरी. मात्र संथ धावगतीमुळे चेंडू आणि धावांमधील अंतर वाढत होते. दरम्यान, आक्रमक फटके मारण्याच्या नादात कॉनवॉय ४६ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला ग्लेन फिलिप्स अवघ्या २ धावांची भर घालून माघारी परतला.

आता सर्व जबाबदारी मिचेल आणि निशेमवर होती. मात्र रनरेट १३ च्या वर पोहचले होते. निशेमने आल्या आल्या आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सामना रंजक आणि अटीतटीचा बनला. दरम्यान १३ चेंडूत २१ धावांची गरज असताना आदिल रशीदने निशेमची ११ चेंडूत २७ धावांची केलेली खेळी संपवली.

निशेम बाद झाल्यांनतर अर्धशतक पूर्ण केलेल्या मिचेलने आक्रमक फटके मारण्यास सुरुवात केली. त्याने ख्रिस वोक्सला १९ व्या षटकाच्या दोन चेंडूत ८ धावा ठोकून सामना १० चेंडूत १२ धावा असा आणला. त्यानंतर त्याने तिसऱ्या चेंडूवर षटकार मारत सामना ९ चेंडूत ६ धावा असा आवाक्यात आणला.

तत्पूर्वी, आयसीसी वर्ल्डकप टी २० स्पर्धेत पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्धच्या ( ENG vs NZ ) सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचे सलामीवीर जोस बटलर आणि जॉनी बेअरस्टो यांनी सावध सुरुवात करत ६ षटकात ३७ धावांची सलामी दिली.

त्यानंतर मात्र न्यूझीलंडने विकेट काढण्यास सुरुवात केली. मिलनेने बेरअस्टोला १३ धावांवर बाद केले. त्यानंतर २९ धावांची खेळी करून इंग्लंडला अर्धशतकी मजल मारून देणाऱ्या बटलरला सोधीने बाद केले. त्यानंतर आलेल्या डेव्हिड मलान आणि मोईन अली यांनी डाव सावरत शतकी मजल मारून दिली.

मोईन अली आणि मलानने धावगती वाढवण्यास सुरुवात केली. मलान अर्धशतकाजवळ पोहचला असताना साऊदीने त्याला ४२ धावांवर बाद केले. मलान बाद झाल्यानंतर मोईन अलीने आक्रमक पवित्रा अवलंबला. त्याने आणि लिम लिव्हिंगस्टोननने संघाला दीडशतकी मजल मारुन दिली. मोईनने ३७ चेंंडूत नाबाद ५१ धावा केल्या. इंग्लंडने २० षटकात ४ बाद १६६ धावांपर्यंत मजल मारुन दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button