अर्थभानअहमदनगरआंतरराष्ट्रीयआरोग्यएज्युदिशाऔरंगाबादकोकणकोल्हापूरक्राईम डायरीजालनाठाणेनाशिक / उत्तर महाराष्ट्रपालघरपुणेफीचर्सबहारभूमिपुत्रमनोरंजनमराठवाडामहाराष्ट्रमुंबईयुथवर्ल्डरायगडराष्ट्रीयविदर्भविश्वसंचारसंपादकीयसांगलीसातारासोलापूरस्पोर्ट्स

Jalgaon Bank Election: सहकार आणि शेतकरी पॅनलसाठी ४२ उमेदवार रिगणात

जळगाव; पुढारी वृत्तसेवा: जळगाव जिल्हा बँकेच्या २१ संचालकांच्या निवडणूकीसाठी ( Jalgaon Bank Election ) ८ नोव्हेंबर रोजी १0८ उमेदवारांच्या माघारीनंतर ५ गटातील ४२ उमेदवारांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. निवडणूक लढवित असलेल्या ४२ उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडून मंगळवार दुपारी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. यात निवडणूक रिंगणात असलेल्या दोन ते तीन उमेदवार वगळता अन्य उमेदवारांनी सहकार व शेतकरी पॅनल गठीत केले असून बुधवारपासून निवडणूक प्रचाराला सुरूवात केली जाणार आहे. तर निवडून आलेल्या उमेदवारांमधून अध्यक्ष- उपाध्यक्षपदासाठी चुरस रंगणार असल्याचे चित्र आहे.

२०२१-२०२६ सालाच्या जिल्हा बँकेच्या २१ संचालकांची निवडणूकीसाठी ( Jalgaon Central Bank Election ) २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २१ रोजी मतमोजणी घेण्यात येणार आहे. याआधी जिल्हा बँकेची सर्वपक्षीय पॅनलच्या माध्यमातून होणारी निवडणूक बिनविरोध झालेली आहे. परंतु, यावेळी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यत विविध चर्चां,आडाखे साफ चुकवत बिनविरोध होणारी निवडणूक १०८ उमेदवारांच्या माघारीनंतर ४२ जणांच्या शेतकरी व सहकार पॅनलच्या माध्यमातून चांगलीच रंगणार आहे.

बिनविरोध संचालक

जिल्हा बँकेच्या २१संचालकांपैकी मुक्ताईनगरमधून माजी मंत्री एकनाथराव खडसे, अमळनेरमधून आमदार अनिल पाटील, चाळीसगावमधून प्रदिप देशमुख, धरणगावमधून संजय पवार, एरंडोलमधून अमोल चिमणराव पाटील, पारोळामधून आमदार चिमणराव पाटील, जळगावमधून महापौर जयश्री महाजन, जामनेरमधून नाना पाटील, पाचोरामधून आ. किशोर पाटील, बोदवडमधून ऍड. रविंद्र पाटील, भडगावमधून प्रताप हरी पाटील असे ११ संचालक बिनविरोध निवडले गेले आहेत.

निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना चिन्हांचे वाटप

शांताराम धनगर, आ. संजय सावकारे ( भुसावळ विकासो), प्रशांत चौधरी, गणेश नेहते, विनोद पाटील (यावल), जनाबाई महाजन, अरूण पाटील, राजीव पाटील (रावेर), घनःश्याम अग्रवाल, संगीताबाई पाटील, सुरेश शामराव पाटील, इतर संस्था व व्यक्ती मतदार (चोपडा), गुलाबराव देवकर, प्रकाश पाटील, रविंद्र सूर्यभान पाटील, उमाकांत पाटील, प्रकाश सरदार जळगावमधून लढत आहेत.

तर अॅड. रोहीणी खडसे-खेवलकर, शैलजादेवी निकम, अरूणा दिलीपराव पाटील, कल्पना शांताराम पाटील, शोभा पाटील, सुलोचना पाटील (महिला राखीव प्रवर्ग), प्रकाश पाटील, राजीव पाटील, डॉ. सतीश पाटील, विकास पवार (इतर मागास प्रवर्ग), नामदेव बावीस्कर, प्रकाश सरदार, शामकांत सोनवणे (अनु.जाती-जमाती प्रवर्ग), मेहताबसिंग नाईक, विकास वाघ (वि.जा.,भ.ज., विमाप्र प्रवर्ग) असे उमेदवारांमध्ये लढत आहे. या उमेदवारांना कपबशी, नारळ, मोटारगाडीसह अन्य निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले.

निवडणूक चिन्ह वाटपानंतर दोन उमेदवार वगळता शेतकरी व सहकार पॅनल गठीत झाले आहे. यातील शेतकरी गटात ९ जणांच्या पॅनलमध्ये जनाबाई गोटू महाजन, विनोद पाटील, घनःश्याम अग्रवाल, गुलाबराव देवकर, अॅड. रोहीणी खडसे-खेवलकर, शैलजादेवी निकम, शामकांत सोनवणे, मेहताबसिंग नाईक व डॉ. सतीष पाटील यांचा समावेश आहे.

तर सहकार पॅनलमध्ये अरूणा पाटील, विकास पवार, विकास वाघ, कल्पना पाटील, रविंद्र पाटील, राजीव पाटील, सुरेश शामराव पाटील या ७ जणांचा समावेश असून कॉंग्रेसच्या उमेदवारांमध्ये यावलचे विनोद पाटील, चोपड्याचे सुरेश शामराव पाटील, जळगावच्या शैलजादेवी निकम यांच्यासह अन्य उमेदवार आहेत.

अध्यक्ष व उपाध्यक्षांसाठी चुरस

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूक निकालानंतर जिल्हा बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी चुरस रंगणार आहे. बिनबिरोध निवड झालेल्या सदस्यांमध्ये आ. चिमणराव पाटील यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष तर आ. किशोर पाटील यांनी उपाध्यक्ष म्हणून यापूर्वी कामकाज केले आहे. तर महिला राखीवसह अन्य मतदार संघातून निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांमध्ये माजी आ. डॉ. सतीश पाटील, अॅड. रोहिणी खेवलकर यांनी देखील अध्यक्षपद भूषवले आहे.

माजी आ. गुलाबराव पाटील, संजय सावकारे यांचेसह अन्य संचालक म्हणून कामकाज पाहिले आहे. या बिनविरोध ११ व १० सदस्यांमधून निवडून गेलेल्या उमेदवारांमधून अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी अनेकजण इच्छुक असून माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी आ. सतीष पाटील, आ. किशोर पाटील, माजी आ. गुलाबराव देवकर, ऍड. रविंद्र पाटील या महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादीच्याच पदाधिकार्‍यांमध्ये चुरस रंगणार असल्याचे चित्र पाहायला मिळणार आहे.

हेही वाचलंत का? 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button