अर्थभानअहमदनगरआंतरराष्ट्रीयआरोग्यएज्युदिशाऔरंगाबादकोकणकोल्हापूरक्राईम डायरीजालनाठाणेनाशिक / उत्तर महाराष्ट्रपालघरपुणेफीचर्सबहारभूमिपुत्रमनोरंजनमराठवाडामहाराष्ट्रमुंबईयुथवर्ल्डरायगडराष्ट्रीयविदर्भविश्वसंचारसंपादकीयसांगलीसातारासोलापूरस्पोर्ट्स

Pirem film : ‘पिरेम’ चित्रपटाचा टीझर पाहिला का? (video)

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मुलगी झाली हो फेम आणि अभिनेत्री दिव्या सुभाष आणि विश्वजीत विठ्ठल पाटील यांचा नवीन मराठी चित्रपट ‘पिरेम’ ( Pirem film)  येतोय. या चित्रपटाच्या टीझरमध्ये  लव्हस्टोरीची कथा दाखवण्यात आल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

कोरोना कालावधीनंतर पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण तयार झाले असून अनेक प्रकारचे नवनविन चित्रपट चाहत्यांच्या भेटीस येत आहे. याच दरम्यान नव्या दमाच्या पर्व फिल्म्सने दिव्या सुभाष आणि विश्वजीत विठ्ठल पाटील यांचा आगामी मराठी ‘पिरेम’ ( Pirem film) चित्रपट घेवून येत आहे. या चित्रपटाच्या शीर्षकावरून ही एक लव्हस्टोरी असल्याचे समजते. या चित्रपटात अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाचा सा उमटवला आहे.

‘पिरेम’ चित्रपटाचा नुकताच टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. पर्व फिल्म्स प्रस्तुत ‘पिरेम” या चित्रपटाच्या टीझरमध्ये प्रेमाच्या निरनिरळ्या छटा दाखवण्यात आल्या आहेत. या चित्रपटातील खास म्हणजे, नवीन कलाकारांची जोडी रूपेरी पडद्यावर पदार्पण करणार सज्ज झाली आहे. या टीझरने चाहत्यांची उत्सुकता िगेला पोहोचली आहे.

पर्व फिल्म्स प्रस्तुत पिरेम” या सिनेमाचे निर्मिता विश्वजीत विठ्ठल पाटील यांनी केली असून दिग्दर्शक प्रदीप रंगराव लायकर यांनी केलं आहे. तर सुप्रसिद्ध संगीतकार जोडी रोहन-रोहन यांनी या सिनेमाला संगीत दिले आहे. ३ डिसेंबर २०२१ रोजी हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे.

असोसिएट डिरेक्टर विजय केरबा आणि सह दिग्दर्शन धीरज पोवार, मृगया केणी यांनी केलं आहे. या चित्रपटाचे ‘मन झाले…’ हे पहिलं गाणे उध्या चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

हेही वाचलंत का? 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button