अर्थभानअहमदनगरआंतरराष्ट्रीयआरोग्यएज्युदिशाऔरंगाबादकोकणकोल्हापूरक्राईम डायरीजालनाठाणेनाशिक / उत्तर महाराष्ट्रपालघरपुणेफीचर्सबहारभूमिपुत्रमनोरंजनमराठवाडामहाराष्ट्रमुंबईयुथवर्ल्डरायगडराष्ट्रीयविदर्भविश्वसंचारसंपादकीयसांगलीसातारासोलापूरस्पोर्ट्स

Ti Parat Aaliye : ‘ती परत आलीये’ मध्ये हणम्याच्या जीवाला धोका?

मुंबई; पुढारी ऑनलाईन : छोट्या पडद्यावर नुकतेच चाहत्यांच्या भेटीस आलेली ‘ती परत आलीये’ ( Ti Parat Aaliye ) ही मालिका चांगलीच रंगत चालली आहे. या मालिकेने अगदी पहिल्या भागापासूनच चाहत्यांना खिळवून ठेवल्याने मालिकेला चाहत्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. ‘ती परत आलीये’ या मालिकेत व्यक्तिरेखा देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरल्या आहेत.

त्यातीलच एक लक्षवेधी भूमिका म्हणजे हणम्याची. अभिनेता समीर खांडेकर हि व्यक्तिरेखा अगदी चोख बजावतोय. पण आता मालिकेत ( Ti Parat Aaliye ) हणम्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

मालिकेच्या आगामी भागात मित्रांचे पालक त्यांना शोधत रिसॉर्टजवळच्या जंगलात येतात आणि मास्कधारी व्यक्तीच्या कचाट्यात सापडतात. यानंतर मित्रांना कळतं की, त्यांचे नातेवाईक त्यांना शोधत आले आहेत. पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मात्र, त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो.

मास्कधारी व्यक्ती मित्रांच्या नातेवाईकांना पकडून एका अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवते. मित्र आपल्या नातेवाईकांना शोधण्याचा खूप प्रयत्न करतात पण ते त्यांना सापडत नाहीत.

हणम्याला टीव्ही रुममध्ये त्याच्या वडिलांना बांधून ठेवलेलं दिसतं आणि तो त्यांना शोधत जंगलात पळतो आणि त्यामध्ये हणम्या मास्कधारी व्यक्तीच्या तावडीत सापडतो. मस्कधारी व्यक्तीच्या तावडीत सापडल्यामुळे हणम्याच्या जीवाला धोका निर्माण होणार यात शंका नाही. आता मस्कधारी व्यक्ती हणम्याचा जीव घेईल कि, हणम्या त्या मस्कधारी व्यक्तीच्या पर्दाफाश करेल हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

हेही वाचलंत का? 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button